Advertisement

दारुच्या दुकानांवर महान व्यक्तींची, गड-किल्ल्यांची नाव लिहण्यास मनाई

मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दारुच्या दुकानांवर महान व्यक्तींची, गड-किल्ल्यांची नाव लिहण्यास मनाई
SHARES

मुंबईतील दुकानांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत, असे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहे. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील दुकानांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणं आवश्यक आहे. तसंच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिलं जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असलं पाहिजे.

एवढेच नव्हे तर ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरवले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांवर नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकानं आणि आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असं मुंबई महानगरपालिकेनं आदेश दिले आहेत.

मुंबईतील प्रत्येक दुकानं नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. परंतु, अशा दुकानांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील आणि लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षर हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणं आवश्यक आहे.

तसंच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.

तसेच, ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरवले जाते किंवा विकले जाते, अशा दुकानांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही.



हेही वाचा

मुंबईतील शाळांना मराठी भाषेतून नावाची सक्ती

‘बेस्ट’चे वीज बिल भरणासाठी आता मोबाइल व्हॅन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा