Advertisement

मालमत्ता करामुळे पालिका मालामाल, यंदा सर्वाधिक करवसुली

मुंबई महापालिकेला यंदा मालमत्ता करातून सर्वाधिक वार्षिक उत्पन्न मिळाले आहे.

मालमत्ता करामुळे पालिका मालामाल, यंदा सर्वाधिक करवसुली
SHARES

मुंबई महापालिकेला यंदा मालमत्ता करातून सर्वाधिक वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षांत महापालिकेनं मालमत्ता कराची १०० टक्क्यांहून अधिक वसुली केली आहे. बुधवापर्यंत ५२०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी यात आणखी दोनशे कोटींची भर पडण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागानं ३० मार्चपर्यंत ५,२३७ कोटी रुपये महसूल जमा केल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच गुरुवारी ३१ मार्च रोजी म्हणजेच आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी आणखी २०० कोटी रुपये कर जमा होण्याची शक्यता आहे.

मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी साधारण ५ ते ६ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळत असते. त्यामुळे मालमत्ता करवसुलीकडे पालिका प्रशासनाचं लक्ष लागलेलं असतं. चालू आर्थिक वर्षांत पालिकेनं मालमत्ता करवसुलीतून ७ हजार कोटी रुपये उत्पन्न अंदाजित केले होते.

दर पाच वर्षांनी होणारी करफेररचना या वर्षी होऊ न शकल्यामुळे पालिकेनं मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट सुधारित करून ४८०० कोटी रुपयांवर आणले होते. वसुलीचे हेच उद्दिष्ट गाठण्यात पालिकेला यश आलं आहे. असून यंदा १०० टक्क्यांपेक्षा जास्त करवसुली झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत (२०२०-२१) पालिकेनं अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ६,७६८ कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तविला होता. मात्र टाळेबंदीमुळे पालिकेनं अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजात वसुलीचे लक्ष्य ५,२०० कोटी रुपयांवर आणले होते.

आर्थिक वर्ष संपेपर्यत पालिकेला ५,१३५.४३ कोटी रुपयांची म्हणजेच ९८ टक्के वसुली करणं शक्य झालं होतं. मात्र चालू आर्थिक वर्षांत (२०२१-२२) हा विक्रमही मोडला आहे. त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच मार्च २०२० मध्ये पालिकेने ४ हजार १६१ कोटी रुपयांची वसुली केली होती.



हेही वाचा

कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, 'जे जे'मधील निवासी डॉक्टरला अटक

गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? राजेश टोपे म्हणाले...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा