Advertisement

गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? राजेश टोपे म्हणाले...

गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार का?

गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? राजेश टोपे म्हणाले...
SHARES

महाराष्ट्रात इतक्यात तरी मास्कमुक्ती शक्य नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, परदेशातील परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे.

याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘दुसऱ्या देशांमध्ये चौथ्या लाटेचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे अगदीच मास्क घालयचा नाही. अशी हिंमत आपण करू शकणार नाही. नागरिकांसाठी ते हितकारक आहे. आपल्याला संसर्ग झाला असेल तर इतरांना संसर्ग होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्तीचा विचार नाही.

टोपे यांनी पुढे सांगितलं की, सर्वांचं लसीकरण झालं आहे की नाही यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मास्कमुक्ती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची मागणी देखील झाली आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्र राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलं.

गुढीपाडव्याला (Gudivada) आणखी तीन दिवस उरले असून तोपर्यंत यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, नंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.

मात्र गुढीपाडव्याला आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी वैयक्तिकपणे गुढी उभारण्याची परंपरा असून त्या उत्साहाला कुठेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी हा सण उत्साहानं साजरा करावा, असं टोपे यांनी सांगितलं. तसंच इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth wave) सुरू आहे. आपल्याकडे बस, रेल्वे, हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणांवर फार निर्बंध नाहीत. फार कमी नियम ठेवण्यात आले आहेत. याची जाणीव ठेवत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी मुंबई लोकलमध्ये फक्त लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या अत्यंत वादग्रस्त निर्णयाबद्दल देखील बोलले. लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी हे केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यभरात नोंदवलेल्या कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार १ एप्रिलपासून बहुसंख्य कोविड-19 निर्बंध शिथिल करू शकेल अशी अटकळ बांधली जात आहे. एक-दोन दिवसांत याबाबत अधिकृत सूचना अपेक्षित आहे.

राज्यातील लसीकरणाची स्थिती सांगताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढील आकडेवारी सांगितली. १८ च्या पुढील पहिल्या डोसचे प्रमाण ९२ टक्के आहे. दुसऱ्या डोसचे प्रमाण ७४ टक्के आहे. म्हणजे २५ टक्के अजून दुसरा डोस घेणारे बाकी आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रात चौथ्या लाटेची भिती, आढळला कोविडचा नवा व्हेरिएंट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा