Advertisement

साडेचार लाखांचे मोबाइल टॉयलेट!


साडेचार लाखांचे मोबाइल टॉयलेट!
SHARES

मुंबई - मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा दावा केल्यानंतर महापालिकेने मुंबईकरांच्या सेवेशी 25 फिरती शौचालये (मोबाइल टॉयलेट) खरेदी करत आहे. तब्बल एक कोटी आठ लाख रुपये खर्च करून ही 25 मोबाइल टॉयलेट खरेदी करण्यात येत आहे. एका मोबाइल टॉयलेटसाठी चार लाख 34 हजार रुपये मोजले जाणार आहेत. त्यामुळे साडेचार लाखांच्या या मोबाइल टॉयलेटमुळे अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत.

मुंबईमध्ये वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत गलिच्छ वस्त्यांमध्ये एकूण 618 वस्ती शौचालये बांधलेली असून पैस द्या आणि वापरांतर्गत एकूण 871 शौचालये बांधण्यात आली आहेत. तसेच म्हाडाच्यावतीने एकूण 5 हजार 371 शौचालये बांधण्यात आली आहेत. सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अधिक शौचालयांची बांधणी करण्यात येत असून ज्याठिकाणी शौचालयांची कमतरता आहे, तसेच शौचालये त्वरीत बांधणे शक्य नाहीत, अशा ठिकाणी फिरत्या शौचालयांचा पर्याय निर्माण करत आणखी 25 फिरत्या शौचालयांची खरेदी केल्या आहेत. सध्या महापालिकेची फिरती शौचालये ही नादुरुस्त ठरली असून नेमकी काहीच शौचालये वापरात आहेत.

ही फिरती शौचालये दहा आसनी आहे. प्रत्येक फिरत्या मोबाइल टॉयलेटसाठी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करण्यात येणार असून 25 मोबाईल टॉयलेटसाठी 1 कोटी 8 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार जुहू चौपाटीवर भेट देऊन तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या चौपाटीवर फिरण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी लघुशंकेसाठी कुठलेही प्रसाधनगृह नसल्यामुळे फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे नवीन शौचालयांचे बांधकाम होईपर्यंत चौपाटींसह सार्वजनिक ठिकाणी या मोबाइल टॉयलेटचा वापर केला जाईल. तसेच मुंबईला हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या भागांमध्ये नागरिकांकडून उघड्यावर नैसर्गिक विधी आटोपले जातात, त्याठिकाणीही या मोबाईल टॉयलेटचा वापर केला जाईल, असे महापलिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा