Advertisement

जाेगेश्वरीतल्या प्रभाग ६२ च्या पोटनिवडणुकीला का दिली स्थगिती?


जाेगेश्वरीतल्या प्रभाग ६२ च्या पोटनिवडणुकीला का दिली स्थगिती?
SHARES

जोगेश्वरी पश्चिम येथील मुंबई महापालिकेच्या प्रभाग ६२ मध्ये जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीला मुंबई महापालिकेने स्थगिती दिली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या पोटनिवडणुकीला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले आहे.


...यांचे जात प्रमाणपत्र अवैध

मुंबई महापालिकेच्या प्रभाग ६२मध्ये अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे पराभूत उमेदवार राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर प्रभाग क्रमांक ६२ मध्येच लघुवाद न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित असलेल्या निवडणूक याचिका क्रमांक २९/२०१७ मध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत त्या रिक्त‍ पदाची निवडणूक घेण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६२ चा पोटनिवडणूक कार्यक्रम लघुवाद न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थागित करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.



हेही वाचा

कांदिवलीसह अंधेरीच्या प्रभाग ६२मध्येही होणार पोटनिवडणूक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा