Advertisement

अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द


अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द
SHARES

अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ६२ चे अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वैधता समितीने जातप्रमाणपत्र वैध नसल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला.


जातप्रमाणपत्र बोगस

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६२ मधून अपक्ष म्हणून चंगेझ मुलतानी हे निवडून आले होते. मुलतानी यांनी तब्बल दहा हजार मते मिळवून विजय मिळवला होता. तर शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांना फारच कमी मते मिळाली होती. मुलतानी यांनी या ओबीसी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवताना जातप्रमाणपत्र बोगस दिल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या जातप्रमाणपत्रांची वैधता तपासल्यानंतर ते प्रमाणपत्र वैध नसल्याचे आढळून आले.


१९ ऑगस्टपासून सदस्यत्व रद्द

या निर्णयाची प्रत कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडे पाठवली आहे. मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व १९ ऑगस्ट २०१७पासून रद्द करण्यात येणार आहे.


दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला संधी की पोटनिवडणूक?

चंगेझ मुलतानी यांनी निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांना शिवसेनेने स्थायी समिती सदस्यपदी नियुक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेचा एक नगरसेवक कमी झाला असून या जागी दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर हे आहेत. परंतु त्यांच्या नावाची घोषणा झालेली नसून या मतदार संघात पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून घोषणा होते की पोटनिवडणूक होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी भाजपाचे दिलीप पटेल यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापालिका सभागृहाने केली होती. त्यानंतर पटेल यांनी निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय चुकीचा ठरवल्यानंतर दिलीप पटेल पुन्हा महापालिका सभागृहात परतले होते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा