शिवसेनेचे संख्या'बळ' वाढले

Mumbai  -  

दादर - महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला मुंबईकरांनी जवळपास सारखाच कौल दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात सध्या सत्ता स्थापनेसाठी चुरस लागलेय. शिवसेनेचे 84 तर भाजपाचे 82 नगरसेवक आहेत. पण शिवसेनेला आता संख्याबळ वाढवण्यात यश येत आहे. पाच अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यामध्ये स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, किरण लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मुमताझ खान आणि चंगेझ मुलतानी यांनी बाहेरून शिवसेनेला समर्थन दिले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा आकडा 89 च्या घरात गेलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची या पाच नगरसेवकांसोबत शनिवारी सेनाभवनात बैठक झाली. प्रलोभनांना आणि आमिषांना बळी पडू नका अशी ताकीदही उध्दव ठाकरे यांनी सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना दिलीय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची काही पक्षांशीही चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे महापौर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच असेल यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावले जात आहेत. त्यामुळे 9 मार्चपर्यंत तरी महापौर पदासाठी शिवसेना-भाजपा पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरूच राहिल.

Loading Comments