Advertisement

मस्जिदमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा


मस्जिदमध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
SHARES

मस्जिद - पालिकेने नरशी नाथा स्ट्रीट इथल्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. 10 जानेवारीला केलेल्या या कारवाईत पालिकेने 20 चहाच्या टपऱ्यांसह इतर अनधिकृत दुकानांवर हातोडा चालवला आहे. त्यामुळे रस्त्यांवर असलेली अनधिकृत दुकान आणि फेरीवाल्यांचं अतिक्रमण हटले आहे. याबाबत पालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय शिरुरकर यांना विचारले असता या कारवाईत रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आली असून अशीच कारवाई इतर ठिकाणीही केली जाईल, जेणेकरून वाहतूककोंडीचे प्रमाण कमी होईल, असे ते म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा