रस्ता रुंदीकरणासाठी स्टॉलवर महापालिकेची कारवाई

 Sewri
रस्ता रुंदीकरणासाठी स्टॉलवर महापालिकेची कारवाई

शिवडी - टि. जे. रोडवरील 10 स्टॉलवर पालिका एफ दक्षिण विभागाच्या वतीने मंगळवारी तोडक कारवाई करण्यात आली. हा मार्ग रस्ता रुंदीकरणासाठी मोकळा करून घेण्यात आला आहे. 

"ही कारवाई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. तर या मार्गावरील तोडण्यात आलेले 10 स्टॉल तात्पुरते होते त्यांना महानगरपालिका अधिनियम 317 नुसार परवाना देण्यात आला होता. मात्र हे स्टॉल रस्त्याला अडथळा ठरत असतील तर त्यांच्यावर पालिकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येते. तसेच या परवानाधारक स्टॉल धारकांना विभागातच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे," अशी माहिती एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

वाढत्या वाहतूककोंडीवर आळा बसावा. त्याचबरोबर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी मार्ग मोकळा असावा. ज्या भागांमध्ये अपघात होतात अशा सर्व भागांतील ठिकठिकाणांची पाहणी करून येथील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे, असा आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या स्टॉलवर कारवाई करण्यात येतेय.

Loading Comments