Advertisement

महिन्याभरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांकडून ६७ लाख दंड वसूल

या कारवाई अंतर्गत पालिकेच्या तिजोरीत दररोज सव्वादोन लाख रुपये दंड जमा होत आहे. दरम्यान या कारवाईला महिना झाला असून, महिन्याभरात पालिकेनं १ हजार ४६ वाहनधारकांकडून ६७ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

महिन्याभरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांकडून ६७ लाख दंड वसूल
SHARES

मुंबईत बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिकेनं 'नो पार्किंग'चा निर्णय घेतला. त्यानुसार 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहन आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत पालिकेच्या तिजोरीत दररोज सव्वादोन लाख रुपये दंड जमा होत आहे. दरम्यान या कारवाईला महिना झाला असून, महिन्याभरात पालिकेनं १ हजार ४६ वाहनधारकांकडून ६७ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

२९ वाहनतळ

महापालिकेनं सार्वजिनक वाहनतळाच्या ५०० मीटर परिसरात पार्किंगला मनाई केली आहे. त्यासाठी २९ वाहनतळ महापालिकेनं मुंबईकरांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर तसेच वाहनतळाच्या बाहेर पार्किंग करणाऱ्यांवर ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जातं आहे.

या वाहनांवर कारवाई

'नो पार्किंग' अंतर्गत कारवाईच्या पाहिल्याच आठवड्यात पालिकेनं २३ लाख रुपये दंड वसूल केला होता. मागील महिन्याभरात ६८४ चार चाकी आणि २४ तीन चाकी तर ३३३ दुचाकी वाहन मालकांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. वाहनतळांची संख्या अधिक असलेल्या चेंबूर आणि मानखुर्द विभागातून ३० हजार रुपये म्हणजे सर्वांत कमी दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाईला यश मिळणार?

महापालिकेनं मुंबईतील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी कारवाई करण्यास सुरूवात केली. परंतु, या कारवाई अंतर्गत पालिका केवळ दंड वसूल करताना पाहायला मिळते आहे. मात्र, अद्याप तरी वाहन चलकांना या कारवाईचं गांभिर्य नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं भविष्यात पालिकेच्या या कारवाईला यश मिळणार का याबाबत शाशंका आहे.



हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात १० इलेक्ट्रीक बस दाखल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा