Advertisement

पहिल्या पोलिस आयुक्तांचा पुतळा देण्यास पालिकेचा नकार

मुंबई शहराचे प्रथम पोलिस आयुक्त सर फ्रँक एच साऊटर यांचा महापालिकेच्या भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे हा पुतळा पोलिस आयुक्तालयाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र प्रशासनाने हा पुतळा देण्याची तयारी दर्शवली असली तरी गटनेत्यांनी मात्र या पुतळा देण्यास नकार दिला आहे.

पहिल्या पोलिस आयुक्तांचा पुतळा देण्यास पालिकेचा नकार
SHARES

मुंबई शहराचे प्रथम पोलिस आयुक्त सर फ्रँक एच साऊटर यांचा पुतळा पोलिसांना देण्यास महापालिकेनं नकारलं आहे. सर फ्रँक एच साऊटर यांच्या पुतळ्याचा शोध घेतल्यानंतर मुंबई पोलिसांना हा पुतळा भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयात असल्याचा आढळून आला होता. त्यामुळे हा पुतळा मुंबई पोलिस वस्तूसंग्रहालयात ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने महापालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा पुतळा देण्याची तयारी दर्शवली असली तरी गटनेत्यांनी मात्र या पुतळा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा पुतळा भाऊ दाजी वास्तूसंग्रहालयातच राहणार आहे.


त्यामुळे पुतळ्याची केली मागणी?

मुंबई शहराचे प्रथम पोलिस आयुक्त सर फ्रँक एच साऊटर यांचा महापालिकेच्या भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे हा पुतळा पोलिस आयुक्तालयाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसालगीकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.


गटनेत्यांकडून प्रस्तावाला असंमती

संग्रहालयातून कोणतीही वस्तू किंवा पुतळा दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हलवणार आहे, ते ठिकाण आणि संग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करणं आवश्यक आहे. त्यानुसार या पुतळ्याची कायमस्वरुपी मालकी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची राहिल, या अटींवर पोलिस आयुक्तालयातील मुंबई पोलिस वस्तूसंग्रहालयाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रशासनानं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेपुढे प्रस्ताव सादर केला होता. परंतु गटनेत्यांनी हा प्रस्ताव असंमत केला आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी या पुतळ्याची मालकी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची असून तो पुतळा पोलिस वस्तूसंग्रहालयाला देणं उचित नाही. यामुळे प्रशासनाला हा पुतळा हस्तांतरीत करण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं.


पोलिसांनी केली चौकशी

सर फ्रँक एच साऊटर हे १८६४ ते ८८ या काळात मुंबईचे पहिले आयुक्त होते. त्यांची आठवण कायम राहावी म्हणून त्यांचा अर्धपुतळा पोलिस मुख्यालयातील प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. परंतु, कालांतराने हा पुतळा तिथून हटवण्यात आला होता. मात्र हा हटवलेला पुतळा गायब कुठे झाला, याची माहिती खुद्द मुंबई पोलिसांकडेही नव्हती. त्यामुळे या अर्धपुतळ्याचं गुढ उकरून काढण्यासाठी पोलिसांनी इतिहास अभ्यासक आणि माजी पोलिस अधिकाऱ्यांकडेही चौकशी केली.


अखेर माहिती मिळाली

हा पुतळा भायखळा येथील महापालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. १९७० मध्ये विविध शहरांतून अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांचे पुतळे हे भाऊ दाजी लाड संग्रहालयात हलवण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी याची पाहणी केल्यानंतर हा पुतळा याठिकाणी असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर हा पुतळा पोलिस वास्तूसंग्रहालयाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी पोलिस आयुक्तालयानं केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा