Advertisement

महापालिकेची खेळाची मैदाने शाळांना अल्प दरात


महापालिकेची खेळाची मैदाने शाळांना अल्प दरात
SHARES

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खेळासाठी आरक्षित असलेली मैदाने मुंबईतील शाळांच्या क्रीडा स्पर्धेसाठी नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येतील, तशा सूचना महापालिकेला दिल्या जातील, असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिलं.


आकारण्यात येतं भरमसाठ भाडं

विविध क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमासाठी महापालिकेची मैदाने भाड्याने देताना भरमसाठ भाडं आकारण्यात येतं. हे भाडे कमी करण्यात यावं, अशी मागणी भाजपाचे भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. तसंच आ. कपिल पाटील यांनी मुंबईतील अनेक शाळांना मैदाने नाहीत, त्यांना महापालिकेच्या ताब्यातील मैदाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी सामान्य नागरिकांना धार्मिक उत्सवासाठी आणि खेळासाठी ही मैदाने किफायतशीर भाड्यात देण्याची मागणी केली.


दिवसाला १ हजार भाडं

त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी महापालिकेच्या ताब्यात ३०८ मैदान असून माफक दरातच ती उपलब्ध करून देण्यात येतात. क्रीडा स्पर्धांसाठी एका दिवसाला १ हजार रुपये भाडं आकारण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे भाडं आकारणी होत नसंल, तर तशा स्पष्ट सूचना महापालिकेला देण्यात येतील.

शाळांच्या जवळ असलेली महापालिकेची मैदाने विद्यार्थ्यांना खेळ व शाळेच्या कार्यक्रमासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. धार्मिक उत्सवासाठी मैदाने नाममात्र दरांत देण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा