Advertisement

गणपत पाटीलनगरमधील तिवरांचा पट्टा मोकळा, तब्बल ८०० झोपड्या हटवल्या


गणपत पाटीलनगरमधील तिवरांचा पट्टा मोकळा, तब्बल ८०० झोपड्या हटवल्या
SHARES

मुंबईतील धारावीनंतर सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत पाटीलनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर महापालिका कडक कारवाई करत आहे. मागील आठवड्यात येथील ५०० अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आलं. त्यानंतर मंगळवारी आणखी ३०० झोपड्या जमीनदोस्त करत तिवरांच्या झाडांचा पट्टा अतिक्रमणमुक्त केला जात आहे.


महापालिकेच्या आर/ उत्तर विभागाची मोहीम

दहिसर पूर्व भागातील गणपत पाटीलनगरमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या आहेत. त्या सर्व झोपड्या तोडण्याची मोहीम महापालिका आर/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी हाती घेतली आहे. गणपत पाटीलनगर हे पूर्णपणे खारफुटीच्या जागेवर वसलेलं आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्या जात आहेत.


८०० झोपड्या जमीनदोस्त

गणपत पाटीलनगरमध्ये सुमारे १२ हजारांहून अधिक झोपड्या आहेत. यासर्व खारफुटीच्या जागेवर वसलेल्या आहेत. त्यामुळे खारफुटीवरील या झोपड्या तोडण्यासाठी मागील सीआरझेड पट्ट्याच्या भागातून कारवाई हाती घेतली आहे. याठिकाणच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत आतापर्यंत ८०० झोपड्या जमीनदोस्त केल्याची माहिती आर/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली आहे. 


तिवरांच्या झाडांचा पट्टा मोकळा

याशिवाय बांबू आणि प्लास्टिक लावून झोपड्या उभारण्याचा जो प्रयत्न केला जात होता, तोही हणून पाडत नव्याने झोपड्या बांधण्यास अटकाव केला जात आहे. तिवरांच्या पट्ट्यात असणाऱ्या या सर्व झोपड्या असून येथील किनाऱ्याच्या मागील बाजूने कारवाई हाती घेऊन तिवरांच्या झाडांचा पट्टा मोकळा केला जात असल्याचे नांदेडकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा