Advertisement

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार- मुंबई महापालिका

क्लिनअप मार्शलकडून होणारी कारवाई दंडात्मक कारवाई बंद करून यापुढे नवी एजन्सी नेमली जाणार आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार- मुंबई महापालिका
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाची लागण झाल्याचे रुग्णही दिवसेंदिवस कमी प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळं महापालिका प्रशासन व राज्य सरकारनं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी, तोंडावरील मास्कची सुटका कधी होणार असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहेत. शिवाय, काहीजण कोरोना कमी झाल्यानं मास्कचा वापरही टाळत आहेत. परंतू, महापालिका प्रशासनाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आता कोविडचा संसर्ग होत नसल्याने मास्कची आवश्यकता नाही, असाही सूर काहीजण लावत आहेत. मात्र, विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरील कारवाई बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

क्लिनअप मार्शलकडून होणारी कारवाई दंडात्मक कारवाई बंद करून यापुढे नवी एजन्सी नेमली जाणार आहे. तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत नव्या एजन्सीमार्फत कारवाई सुरू न झाल्यास पालिकेचे कर्मचारी ही कारवाई करणार आहेत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा