Advertisement

प्रदूषण कमी करण्यासाठी 1 डिसेंबरपासून रस्ते धुतले जाणार

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) म्हणाली की मुंबईतील खराब हवेच्या गुणवत्तेचा सामना करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी 1 डिसेंबरपासून रस्ते धुतले जाणार
SHARES

मुंबईतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी 1000 किमी लांबीच्या रस्ते धुतले जाणार आहेत. 1 डिसेंबरपासून या मोहिमेला सुरुवात होईल.

विशेष म्हणजे त्यासाठी पिण्याच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असा दावा मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आला आहे. 

वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबईत टप्‍प्‍याने जास्‍तीत जास्‍त रस्ते धुण्याचे उद्दिष्ट निश्चित करत महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन केले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली होती.

मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री यांनी दिले होते.

त्यानुसार, महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्‍या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये रस्ते, पदपथ धुवण्याची कामे वेगाने सुरू आहेत.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यातून धूळ पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत. त्याचबरोबर साचलेली धूळ हटवण्याची कार्यवाही करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

रस्ते आणि पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी, महापालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे.



हेही वाचा

BMC च्या नवीन हॅल्पलाईन नंबरवर कचरा जाळण्याच्या तक्रारींचा पूर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा