ग्रँट रोडवर एक दुचाकीस्वार नाल्यात पडल्याच्या घटनेनंतर बीएमसी देखभाल कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. स्ट्रॉम वॉटर ड्रेन (SWD) विभागातील अधिकारी देखील भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नाल्या आणि मॅनहोल्सच्या स्थितीचा आढावा घेतील.
मंगळवारी रात्री डोंगरी येथील रहिवासी उस्मान वसीम हा ग्रँट रोड परिसरातील एमएस अली रोडवरून बाईकने जात होता. पण गंजलेल्या आणि जुन्या झाकणावरून बाईक गेली. त्यामुळे झाकण तुटल्याने ते नाल्यात पडले. उस्मान किरकोळ जखमी झाला.
अभिजीत बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प), म्हणाले की, "सुदैवाने, घटनेच्या वेळी पाऊस नव्हता आणि दुचाकीस्वार नाल्यात एका शिडीवर अडकला होता. तथापि, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी देखभाल कंत्राटदाराकडून स्पष्टीकरण मागण्याची सूचना SWD अधिकाऱ्यांना केली आहे."
त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना शहरातील सर्व नाले आणि मॅनहोल्सचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ते योग्यरित्या झाकलेले आहेत की नाही याची खात्री करून घेण्यास सांगितले आहे. शिवाय खराब झालेल्या मॅनहोल्सच्या झाकणांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर नाल्याची (ॲक्सेस शाफ्ट) दुरुस्ती करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, बीएमसीने गेल्या वर्षीपासून नाल्यांमध्ये पडण्याचा घटना कमी करण्यासाठी शहरातील पूरप्रवण भागात संरक्षक ग्रील्स बसवण्यास सुरुवात केली. या पावसाळ्यात सर्व मॅनहोल संरक्षक ग्रील्सने झाकल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.
हेही वाचा