मुंबईतील मुख्य ५ ठिकाणी पार्किंगला मज्जाव

महापालिकेनं मुंबईतील ५ मुख्य रस्ते पार्किंगमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेनं नो पार्किंगचा निर्णय घेतला. अशातच आता महापालिकेनं मुंबईतील ५ मुख्य रस्ते पार्किंगमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महर्षी कर्वे मार्ग, एस. व्ही. रोड, गोखले रोड, न्यू लिंक रोड, एल.बी.एस. मार्ग या शहरातील महत्त्वाच्या मार्गावर वाहनं उभी करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. तसंच, या मार्गावरील बेस्ट थांब्यांच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ५० मीटर म्हणजे १०० मीटर परिसरात वाहनं उभी करण्यास मनाई असणार आहे. येत्या ३० ऑगस्टपासून या ५ रस्त्यांवर 'पार्किंगमुक्ती'ची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

१४ किमीचा भाग

महापालिकेनं या सर्व रस्त्यांचा मिळून सुमारे १४ किमीचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूनं पार्किंगमुक्त करण्याचं ठरवलं आहे.  या मार्गावरील बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला ५० मीटर यानुसार एकूण १०० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सहआयुक्त, उपायुक्त, विभागस्तरीय साहाय्यक आयुक्त यांना दिलं आहेत.

नो पार्किंग

महापालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर अंतराच्या परिसरात ‘नो पार्किंग’ राबविण्याचा निर्णय घेत रस्त्यावर बेकायदेशीर वाहनं उभे करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्यानं दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. याचा पुढचा टप्पा म्हणून मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीला गती मिळावी यासाठी या रस्त्यांचे काही भाग वाहनतळमुक्त करण्याचं पालिकेनं ठरवलं आहे.

पार्किंगला मज्जाव

  • महर्षी कर्वे मार्ग – दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशन ते ऑपेरा हाऊस या दरम्यानच्या सुमारे साडे तीन किलोमीटर अंतराच्या महर्षी कर्वे मार्ग.
  • स्वामी विवेकानंद मार्ग – पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशीवरा नदीपर्यंतच्या ६ किलोमीटरच्या अंतरापर्यंत.
  • न्यू लिंक रोड – पश्चिम उपनगरातील ‘न्यू लिंक रोड‘वर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशीवरा नदीपर्यंतच्या सुमारे २ किलोमीटरच्या अंतरावर.
  • लाल बहादूर शास्त्री मार्ग – पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर कल्पतरु ते निर्मल लाईफस्टाईल या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावर.
  • गोखले मार्ग – दक्षिण मुंबईतील दादर परिसरातील गोखले मार्गावर पोर्तुगिज चर्च ते एल. जे. जंक्शन दरम्यानच्या मार्गावर.हेही वाचा -

मागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक राव

शाळा, शिक्षकांना अनुदान, ३०४ कोटी रुपयांचा खर्चसंबंधित विषय
ताज्या बातम्या