SHARE

मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील पदपथ, रस्त्यांवरील दिव्यांचा वीज बिल भरणा ऑनलाइन पद्धतीनं अदा करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. त्यानुसार बेस्ट, रिलायन्स, टाटा आणि महावितरण यासारख्या वीज कंपन्यांकडून पालिका वीज खरेदी करते. दरवर्षी पालिकेला बीलापोटी अडीचशे ते तीनशे कोटीचा भरणा करावा लागतो. दरम्यान वीज बिल मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत ऑनलाइन बिल भरल्यामुळे प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या रूपाने पालिकेचे अडीच ते तीन कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे पालिकेनं ऑनलाइन बिल भरण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घेतलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या