Advertisement

मुंबईकरांच्या हाकेला धावणार 'सीडीआरएफ', लवकरच होणार स्थापना


मुंबईकरांच्या हाकेला धावणार 'सीडीआरएफ', लवकरच होणार स्थापना
SHARES

नैसर्गिक आपत्ती किंवा संकटसमयी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणारं दल म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(एनडीआरएफ). मुंबईत पावसाळ्यात जेव्हा केव्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा हेच दल मुंबईकरांच्या मदतीला धावून येतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने असं एक दल कायम मुंबईकरांच्या दिमतीला असावं, या उद्देशाने लवकरच शहरासाठी स्वतंत्र शहर आपत्ती निवारण दल (सीडीआरएफ) स्थापन करण्यात येणार आहे.


पहिलं शहर

शहरात 'सीडीआरएफ' स्थापन झाल्यास मुंबई हे देशातलं असं दल स्थापन करणारं पहिलं शहर ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात 'सीडीआरएफ' स्थापन करण्यात येणार आहे.


२०० जवानांना प्रशिक्षण

'सीडीआरएफ'च्या टीममध्ये निवड करण्यात येणाऱ्या २०० जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये आग आणि पूरग्रस्त स्थितीतून नागरिकांची मदत कशी करता येईल, त्यांना सुविधा कशा पुरवता येतील, याचं प्रशिक्षण असंल. यासाठी महापालिकेने सुरक्षा विभागातील ३० पेक्षा कमी वयाच्या ग्रॅज्युएट झालेल्या तरूणांची निवड केली आहे. या जवानांना १२ फेब्रुवारीपासून प्रशिक्षण देण्यात येईल.


मुंबईतच प्रशिक्षण

'सीडीआरएफ' टीममध्ये निवडण्यात आलेल्या जवानांना 'एनडीआरएफ'च्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. एवढंच नव्हे, तर अणूहल्ला किंवा जैविक हल्ल्याच्या वेळेस काय उपाययोजना करण्यात यावा, याचंही प्रशिक्षण देण्यात येण्यात येणार अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा