Advertisement

'मुंबई लाइव्ह'चा दणका, अखेर 'ललवाणी' शाळेतील गवत कापणीला सुरुवात


'मुंबई लाइव्ह'चा दणका, अखेर 'ललवाणी' शाळेतील गवत कापणीला सुरुवात
SHARES

मुलुंड पश्चिमेकडील एस. एल. रोड येथील सेवालाल ललवाणी हायस्कूलच्या पटांगणात गवत वाढल्याने तेथे सापांचा वावर वाढल्याची बातमी 'मुंबई लाइव्ह'ने दिली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अखेर या शाळेच्या पटांगणातील वाढलेलं गवत कापण्यास सुरुवात केली आहे.


झाला होता पत्र व्यवहार

पावसाळा संपून २ महिने उलटले, तरी महापालिकेच्या सेवालाल ललवाणी हायस्कूल शाळेमधील पटांगणातील गवत कापण्यात आलं नव्हतं. त्यामुळे शाळेच्या पटांगणात सापांचं प्रमाण वाढलं होतं. याबाबत शाळा प्रशासन आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी महापालिकेला पत्रव्यवहार करून गवत कापण्याची मागणी केली होती. इतकं केल्यानंतरही महापालिकेने या पत्राची कोणतीही दखल घेतली नाही.


गवत कापणी सुरू

पण, यासंदर्भात जेव्हा 'मुंबई लाइव्ह'ने बातमी दिली, तेव्हा महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेतली. याचबरोबर महापालिका अधिकारी ज्योती बकाणे आणि नगरसेवक मनोज कोटक यांनी शाळेला भेट देत पाहणी करून पटांगणातील गवताची कापणी सुरू करण्यास सांगितलं.


गवत कापण्यास शनिवारी सुरुवात झाली आहे. आणखी २ ते ३ दिवसांत कापणी पूर्ण होईल. हे पटांगण मुलांना खेळण्यासाठी खुलं करण्यात येईल.
- प्रशांत सिंग, शिक्षक, सेवालाल ललवाणी हायस्कूल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा