Advertisement

महापालिकेच्या दवाखान्यात मिळणार क्लिनिकची सेवा, तेही 1 रुपयात !


महापालिकेच्या दवाखान्यात मिळणार क्लिनिकची सेवा, तेही 1 रुपयात !
SHARES

आजारी पडल्यावर किवा कोणत्याही रोगावर उपचार घेत असताना प्रचंड पैसा खर्च होतो. महागडा उपचार सामान्यांसाठी परवडणारा नसतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या आसपासच्या परिसरात असलेल्या पालिकेच्या दवाखान्यात आता एक रुपयात क्लिनिकची सेवा उपलब्ध होणार आहे.
मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या एक रुपयात वैद्यकीय उपचार सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हीच आरोग्यसेवा महापालिकेच्या दवाखान्यातही सुरू करण्यात येणार आहे. आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील अवाढव्य दरांमुळे सामान्य नागरिक त्रासलेले असतात. त्यामुळे मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशन्सवर 'वन रुपी क्लिनिक' ही सेवा सुरू करण्यात आली. पण आता ही सेवा आणखी सहजगत्या उपलब्ध होणार आहे.

पालिकेच्या बंद असलेल्या किंवा ज्या दवाखान्यात रिक्त जागा आहेत. त्या ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. झोपडपट्ट्या आणि छोट्या वस्त्यांमध्ये सकाळी 9 ते 4 पर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. या सेवांच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना पात्र पाठवण्यात येणार असल्याचे 'वन रुपी क्लिनिक'चे संस्थापक डॉक्टर राहुल घुले यांनी सांगितले.

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 'वन रुपी क्लिनिक'ची सेवा सुरू झाल्यानंतर, अनेक ठिकाणांच्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी इथे गर्दी केली. ही सेवा सर्व गरजू रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात आला. त्यामुळे घरबसल्या ही सेवा रुग्णांना उपलब्ध झाली आहे, असेही डॉक्टर घुले यांनी सांगितले.
आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांच्या सेवेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या वैद्यकीय चाचण्यांत ताप आणि थायरॉइडच्या चाचण्यांसाठी अधिकाधिक व्यक्ती क्लिनिकमध्ये येत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

अवघ्या महिन्याभरात या क्लिनिकच्या विविध सेंटर्सला सहा हजारांहून अधिक रुग्णांनी भेट दिली आहे. त्यात 3 हजार 800 रुग्ण घाटकोपर, 1 हजार 800 रुग्ण कुर्ला, 700 रुग्णांनी दादर येथे, तर 600 रुग्णांनी वडाळा रोड येथील सेंटरला भेट दिली आहे. विशेष तपासणी मोहिमेत जवळपास 600 हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. जुलै महिन्यापासून ठाणे आणि वाशी येथेही ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू होणार आहे. शिवाय, आणखी महत्त्वाचे म्हणजे, मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ही सेवा सुरू करण्यासाठी संबंधितांशी बोलणे सुरू असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.

हे देखील वाचा - घरबसल्या 1 रुपयात उपचार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा