Advertisement

शिवसेनेचा नवा उपक्रम, 1 जूनपासून मुंबईत सुरु होणार शिव योग केंद्रे

मुंबईत आता १ जूनपासून नागरिकांना योगाचे धडे दिले जाणार आहे.

शिवसेनेचा नवा उपक्रम, 1 जूनपासून मुंबईत सुरु होणार शिव योग केंद्रे
SHARES

मुंबईत (MUMBAI)आता १ जूनपासून नागरिकांना योगाचे (Yoga training) धडे दिले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या जून २०२२ पासून शिव योग केंद्रे (Shiv yoga center)सुरु करण्यात येणार आहेत.

यासाठी किमान ३० नागरिकांच्या समुहाने आपल्‍या विभाग कार्यालयाकडे निर्धारित पद्धतीनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे. योगाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाला दोन तासांचे एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योगा केंद्रांसाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरु केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरु होतील. यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.

इच्छुक नागरिकांच्या समुहासाठी समुह असेल. या सोबतच ज्या समुहाकडे शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल इत्यादींची सोय असल्यास ती ठळकपणे नमूद केल्यास त्यांना प्राधान्य.

ही जागा मोफत उपलब्ध होण्यारकरिता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल अथवा समाज कल्याण केंद्र इत्यादी असे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येईल.

शिव योग केंद्राची पूर्वतयारी, अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. ‌

ज्या योग प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल, त्या संस्थेला सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत देण्यात आलेल्या महितीनुसार विभागवार योग केंद्रावर प्रशिक्षित व अनुभवी योग प्रशिक्षकाची नेमणूक करणे, ५ दिवस योग प्रशिक्षक उपस्थित राहील याची खबरदारी घ्यावी लागेल.

संस्थेद्वारे नेमण्यात येणा–या योग प्रशिक्षकाला नेमून दिलेल्या शिव योगा केंद्रावर नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल.

किमान ३० नागरिकांच्या गटासाठी एक ‘शिव योग केंद्र‘ सुरू करण्यात येईल, एका गटाचा योग प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असेल व प्रशिक्षणाचा कालावधी प्रति‍दिन १ तासाचा असेल. ५ दिवस सकाळी ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.हेही वाचा

बेस्टच! लवकरच बस चालवणारी पहिली महिला चालक होणार रुजू

नवी मुंबईतील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा