यारी रोड परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेचा बुलडोझर


SHARE

अंधेरी यारी रोडवरील कवठेखाडी परिसरात बांधलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्यावतीने धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी खारफुटीच्या जागेवर असलेल्या १७० कच्च्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरीत ६० झोपड्यांवर बुधवारी कारवाई करण्यात येणार आहे.


१७० झोपड्यांवर कारवाई

अंधेरी पश्चिम येथील यारी रोडवरील फिशरीजशेजारी आणि पार्क प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस तिवरांच्या जागांवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्या गेल्या होत्या. तब्बल सव्वा दोनशेहून अधिक झोपड्या याठिकाणी बांधल्या गेल्या होत्या. यासर्व झोपड्या २००० नंतरच्या असल्यामुळे यासर्व अनधिकृत झोपड्यांविरोधात के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी असलेल्या १७० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई सुरुच राहणार आहे. बुधवारी उर्वरीत ६० झोपड्यांवर कारवाई करण्यत येणार असल्याची माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली. हा संपूर्ण खाडीचा भाग आहे. त्यावर मोठ्याप्रमाणात तिवरांची झाडे आहेत. त्यामुळे तिवरांची कत्तल करून या झोपड्या खाडी परिसरात बांधल्या होत्या, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा - 

'पंजाबी तडका' हॉटेलला अनधिकृत बांधकामाचा फटका, म्हाडाची कारवाई


संबंधित विषय