Advertisement

'पंजाबी तडका' हॉटेलला अनधिकृत बांधकामाचा फटका, म्हाडाची कारवाई


'पंजाबी तडका' हॉटेलला अनधिकृत बांधकामाचा फटका, म्हाडाची कारवाई
SHARES

म्हाडाची कोणतीही परवानगी न घेता विक्रोळी टागोरनगरमध्ये अनधिकृत बांधकाम केल्यामुळे 'न्यू पंजाबी तडका' या हॉटेलवर म्हाडाने कारवाई केली आहे.

विक्रोळी टागोरनगरमधील ४१२ आणि ५४ या इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये न्यू पंजाबी तडका हे हॉटेल चालवलं जात होतं. या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने शनिवारी कारवाई करण्यात आली.



मोकळ्या भूखंडावर हॉटेलचे अनधिकृत बांधकाम

विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर येथील म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर हॉटेलचे अनधिकृत बांधकाम केले होते. परंतु, याबाबत न्यायालयाने २०१३ मध्ये स्थगिती आदेश दिल्यामुळे यावर म्हाडाला कारवाई करता येत नव्हती. पण ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर प्रथम सावली ढाबा यांच्या २ हजार चौरस फुटाच्या, तसेच पंजाबी तडका या हॉटेलच्या २६०० चौरस फुटांचे पक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



म्हाडाची परवानगी न घेता केले बांधकाम

या अनधिकृत बांधकामाला म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचे आरोप तसेच तक्रार स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे केली होती. बार आणि हॉटेलसाठी म्हाडाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. मात्र, समाजविकास अधिकाऱ्यांनी या हॉटेलच्या मालकाला झोपडपट्टीधारकास देण्यात येणारा फोटोपास दिला होता. या कागदपत्राच्या आधारेच त्यांनी हॉटेल आणि बारसाठी लागणारे परवाने मिळवले होते. त्यामुळे, हा फोटोपास रद्द करून मंडळाच्या वतीने सुनावणी झाली होती. परंतु, या विरोधातच हॉटेल मालकाने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती.

म्हाडाच्या कुर्ला विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यावतीने केलेल्या या कारवाईत उपअभियंता शाहू, ठाकर, शाखा अभियंता गोवर्धन काळे, विलास डुंबरे, बागुल, सिन्नरकर, तांत्रिक सहाय्यक अनिल परदेशी आदींनी भाग घेतला होता.



हेही वाचा - 

मुंबईतील १६९ अनधिकृत धार्मिक स्थळांवर होणार कारवाई

गोरेगावमधील रेड चिलीजच्या जागेतील अनधिकृत उपहारगृहावर कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा