Advertisement

गोरेगावमधील रेड चिलीजच्या जागेतील अनधिकृत उपहारगृहावर कारवाई


गोरेगावमधील रेड चिलीजच्या जागेतील अनधिकृत उपहारगृहावर कारवाई
SHARES

गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘डीएलएच पार्क’ ही इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ‘रेड चिलीज’ कंपनीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या जागेतील गच्चीवर अनधिकृतपणे उपहारगृह चालवले जात होते.

‘डीएलएच पार्क’ इमारतीच्या चौथ्या मजल्यार ‘रेड चिलीज’ कंपनी आहे. या कंपनीने सुमारे २ हजार चौरस फुटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करून तेथे उपहारगृह सुरू केले होते. याबाबतची तक्रार आल्यानंतर हे सर्व अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले.



महापालिका उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी कार्यरत होते. ही कारवाई करण्यासाठी इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी सतीश नरवणकर व दुय्यम अभियंता अनिकेत बनकर उपस्थित असल्याची माहिती चंदा जाधव यांनी दिली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा