पालिका अतिरिक्त आयुक्तांची ‘दादागिरी’

 Mumbai
पालिका अतिरिक्त आयुक्तांची ‘दादागिरी’

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी उर्मटपणे वागत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत असताना आता ते दादागिरीवरच उतरले आहेत. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुखर्जी यांनी सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशील बडेकर यांना सुरक्षारक्षक सुधाकर मदणे यांच्या कानाशिलात लगावण्याचे आदेश दिले. त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता अधिकाऱ्याने सुरक्षा रक्षकाच्या कानाशिलात लगावली. या प्रकारानंतर पालिका कर्मचारी-अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

मुखर्जी यांच्या या दादागिरीला त्वरीत आवर घालावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस तुकाराम निकम यांनी केली आहे. या मागणीचे पत्र बुधवारी युनियनने पालिका आयुक्तांना पाठवले आहे. मुखर्जी यांच्या दादागिरीला सर्व कर्मचारी वैतागले असून त्यांची ही दादागिरी, उर्मटपणा बंद झाली नाही तर कर्मचारी रस्त्यावर उतरून मुखर्जीविरोधात आंदोलन करेल, असा इशाराही निकम यांनी दिला आहे.

Loading Comments