गाडीने घेतला पेट

गोवंडी - भर रस्त्यात पालिका अधिकाऱ्यांच्या गाडीला आग लागल्याची घटना 19 नोव्हेंबरला संध्याकाळी गोवंडी उड्डाणपुलावर घडली. पालिकेच्या एम पश्चिम विभागाचे अधिकारी देवनार परिसरात पाहणी करण्यासाठी गेले होते. 6 वाजण्याच्या दरम्यान ते पुन्हा कार्यालयाकडे परतत असताना गोवंडी उड्डाणपुलावर अचानक या गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे अधिकारी तात्काळ खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण गाडीलाच आग लागल्याने अधिकऱ्यांनी यासंदर्भात अग्निशमन दलाला कळवलं. त्यानुसार घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले. मात्र तोपर्यंत आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती देवनार अग्निशमन दलानं दिली.

Loading Comments