दक्षता विभागाच्या कामात अमूलाग्र बदल

 Mumbai
दक्षता विभागाच्या कामात अमूलाग्र बदल

मुंबई - महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांच्या स्तरावर केली जाणारी विविध कामे निर्धारीत पद्धतीने आणि सुयोग्य प्रकारे व्हावीत यासाठी दक्षता विभाग देखरेख ठेवते. मात्र आता दक्षता विभागानं हे काम अधिक गुणवत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्हावे, तसेच निविदी प्रकियेमधील स्पर्धात्मकता वाढावी यासाठी दक्षता विभागानं अमूलाग्र बदल केलेत. महापालिकेच्या दक्षता खात्याद्वारे केंद्र सरकारच्या दक्षता विभागाच्या धर्तीवर नवीन सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत निविदा प्रक्रियेत सहभागी होणा-या कंत्राटदारांनी एकावेळेस किती रकमेची कामे हाती घ्यावी, यावर देखील नव्या कार्यपद्धती अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी दिलीय. विशेष म्हणजे मध्यवर्ती निविदा प्रक्रियांबाबत सुधारित कार्यपद्धती सप्टेंबर 2016 मध्येच लागू करण्यात आली आहे.

Loading Comments