Advertisement

दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचं होणार सुशोभीकरण

दादर चौपाटी (Dadar Chowpatty) आणि वरळी किल्ल्याचे (Worli Fort) आता सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अर्थसंकल्पात (Budget) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

दादर चौपाटी, वरळी किल्ल्याचं होणार सुशोभीकरण
SHARES

 दादर चौपाटी (Dadar Chowpatty) आणि वरळी किल्ल्याचे (Worli Fort) आता सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) अर्थसंकल्पात (Budget) यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा (Pond) परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात येणार आहे.  दादर चौपाटी सौंदर्यीकरणाकरिता ४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर वरळी किल्ल्याचे सौंदर्यीकरण, रोषणाई करण्यात येणार आहे. ही रोषणाई वांद्रे वरळी सागरी सेतूवरूनही दिसू शकेल. 

पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Environment and Tourism Minister Aditya Thackeray) यांनी सुचवलेल्या प्रकल्पांसाठी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे वरळी worli) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर)  वरळी परिसरात जी-दक्षिण विभागातील रस्ते आणि पदपथांवर झाडू मारणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सीएसआर (csr) च्या माध्यमातून नागरी कामे करून घेण्याचा हा पहिला प्रयोग आहे.

पालिकेच्या अर्थसंकल्पात (Budget) यंदा पर्यटनाला (Tourism)  विशेष स्थान मिळाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव परिसरही पर्यटनासाठी खुले केले जाणार आहेत. तानसा, मोडक सागर या तलावांच्या ठिकाणी गेस्ट हाऊसही आहेत. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून या विश्रामगृहांची देखभाल केली जाणार आहे. 

मुंबईत नाइटलाइफला परवानगी दिल्यानंतर महापालिकेत स्वतंत्र पर्यटन विभाग सुरू करण्याचा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मानस आहे.  काही दिवसांपूर्वी याबाबत ठाकरे यांची पालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठकही झाली होती. या विभागाच्या माध्यमातून पुरातन परिसराचे संवर्धन, चौपाट्यांचे सुशोभीकरण, जिजामाता उद्यानाचे नूतनीकरण या कामासाठी निधी पुरविण्यात येणार आहे.हेही वाचा -

यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला ७६३८, पश्चिम रेल्वेला ७०४२ कोटींचा निधी

कोस्टल रोड संकल्पचित्राला मुंबईकरांची पसंती!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा