Advertisement

महापालिकेच्या विधी विभागात जिंकण्याची नवी उमेद!


महापालिकेच्या विधी विभागात जिंकण्याची नवी उमेद!
SHARES

 मुंबई महापालिकेच्या विधी विभागाकडे निष्णांत विधी अधिकारी असतानाही अनेकदा महापालिकेची बाजू मांडण्यात ते अपयशी ठरत आहे. त्यामुळे या विभागाला आता मानसिक सक्षम बनवून विधी अधिकारी यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन ९ जून रोजी विशेष कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. नायर येथील ऑडीटोरियममध्ये हा कार्यक्रम होणार असून न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ अनिल साखरे हे विधी विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.



मरगळ दूर करण्याचा प्रयत्न

महापालिकेच्यावतीने लढल्या जाणाऱ्या कोर्ट केसेसमध्ये अनेकदा प्रशासनाची बाजू मांडण्यात विधी अधिकारी अपयशी ठरतात. त्यामुळे त्यांच्याकडून कशाप्रकारे बाजू मांडली जावी, त्यांच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, तसेच सध्या ज्याप्रकारे बाजू मांडली जात आहे ती योग्य दिशेने मांडली जाते का? तसेच महापालिका अधिनियम आणि कायदेशीर लढाई यात कुठे कमी पडतोय? अधिकाऱ्यांच्या काय अपेक्षा असतात आदी बाबींवर मान्यवरांकडून विधी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं उपायुक्त निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं. यामाध्यमातून या विभागात अालेली मरगळ  करून त्यांच्यात उत्साह निर्माण करून जिंकण्यासाठीचे एक मनोबल निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा - 

तृतीयपंथीयांकडून रेल्वेने केली २.२४ लाखांची वसुली

रेल्वेप्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...  



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा