Advertisement

तृतीयपंथीयांकडून रेल्वेने केली २.२४ लाखांची वसुली


तृतीयपंथीयांकडून रेल्वेने केली २.२४ लाखांची वसुली
SHARES

लोकलमध्ये भीक मागणारे तृतीयपंथी लोकल प्रवाशांसाठी सध्या डोकेदुखी झाले आहेत. सतत लोकलमध्ये येऊन भीक मागणं, पैसे नाही दिले, तर प्रवाशांना शिवीगाळ करणं, अशा प्रकारांमुळे प्रवासी तृतीयपंथीयांना वैतागले आहेत. प्रवाशांनी अनेकदा तक्रार करूनही रेल्वे पोलिस याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र हे प्रकार गांभीर्याने घेत आता रेल्वे पोलिसांनी तृतीयपंथीयांविरोधात मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास करत बेकायदेशीररित्या प्रवाशांकडून पैसे घेणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करत रेल्वे पोलिसांनी दंडाच्या स्वरूपात त्यांच्याकडून २ लाख रुपयांची वसुली केली आहे.


ट्विटरवरून तक्रार

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करत असताना एका प्रवाशाकडून तृतीयपंथीयाने जबरदस्तीने पैसे मागण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची तक्रार या प्रवाशाने त्वरीत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आरपीएफकडे केली. त्यावर तृतीयपंथीयांविरोधात कडक कारवाई सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वे वरिष्ठ डिएससी यांनी दिली.


किती तृतीयपंथीयांवर कारवाई?

गेल्या ५ महिन्यांपासून आरपीएफने तृतीयपंत्यांनविरोधात ४६३ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांतर्गत त्यांच्याकडून २ लाख ४३ हजार १५० रुपये वसूल केले आहेत. रेल्वे पोलिस तृतीयपंथीयांकडून दंडवसुली करत असले, तरी प्रवाशांचा त्रास कमी झालेला नाही, असं वांद्रे इथं राहणारे अकबर खान आणि अंधेरी इथं संजय मिश्रा या प्रवाशांनी सांगितलं.



हेही वाचा-

रेल्वे प्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...

कल्व्हर्टच्या सुधारणेसाठीही रेल्वेला हवेत पालिकेकडून पैसे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा