Advertisement

रेल्वेप्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...


रेल्वेप्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...
SHARES

रेल्वेतून प्रवास करताना जो-तो आपल्यासोबत हवं तितकं लगेज म्हणजेच सामान घेऊन निघतो. पण यापुढे हवाई प्रवासाप्रमाणेच रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या सामानाचं वजन करून घ्यावं लागणार आहे. कारण तुमच्याजवळ मर्यादेपेक्षा जास्त सामान आढळून आल्यास त्यावर तु्म्हाला सहापट लगेज चार्ज द्यावं लागणार आहे.


म्हणून रेल्वेने घेतला निर्णय

खरंतर रेल्वेेच्या डब्यात प्रवासी मर्यादेपेक्षा जास्त सामान नेतात, अशी तक्रार वारंवार प्राप्त झाल्यानंतर रेल्वेने याची दखल घेत जुन्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त सामान नेताना प्रवाशाला पकडल्यास सहापट लगेज चार्ज लावला जाईल.

रेल्वेच्या सामानाच्या डब्यातून जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत सामान नेण्याची मुभा आहे. मात्र अनुमतीपेक्षा एखाद्या प्रवाशाकडे जास्त सामान आढळल्यास सामानाच्या दराच्या सहा पट लगेज चार्ज म्हणजेच दंड त्याला भरावा लागणार आहे.


रेल्वेच्या नियमानुसार

मेल/एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक कोचनुसार सोबत नेण्याच्या सामानाचं वजन निश्चित करण्यात आलं आहे. त्यात कमाल वजनापर्यंत सूट देण्यात आली आहे. जादा वजनाचं सामान आढळल्यास अतिरिक्त शुल्क रेल्वेकडून आकारलं जाते. पण, अनेकदा प्रवासी लगेज चार्ज न भरताच नियमबाह्य पद्धतीने सामानाची वाहतूक करत असतात.


एसी पहिल्या वर्गासाठी

  • प्रतिप्रवासी ७० किलो वजनाची मर्यादा
  • अतिरिक्त १५ किलो वजनासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही.
  • अधिक सामान असल्यास अतिरिक्त शुल्क मोजावे लागते
  • कमाल १५० किलोंपेक्षा अधिक सामान नेता येत नाही


एसी टू-टायर स्लीपर

  • प्रतिप्रवासी ६० किलोपर्यंत वजनाच्या सामानासाठी कोणतेही शुल्क नाही
  • १०० किलोपर्यंतचं सामान जादा रक्कम आकारून नेता येतं.

तर एसी थ्री टायर मध्ये प्रतिप्रवासी ५० किलो, तर स्लीपर श्रेणीमध्ये प्रतिप्रवासी ५० किलो वजनासाठी लगेज आकारला जाणार नाही. स्लीपर श्रेणीमध्ये ३० किलोपर्यंत वजनाचं सामान अतिरिक्त रक्कम भरून नेता येते. सेकंड क्लासमध्ये प्रतिप्रवासी ४५ किलोपर्यंतच्या सामानासाठी लगेज चार्ज आकारलं जात नाही. तर त्यापुढे ७० किलोपर्यंचं अतिरिक्त सामान नेण्यासाठी जादा शुल्क भरावं लागतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा