Advertisement

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चणे-शेंगदाणे


महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चणे-शेंगदाणे
SHARES

चिक्कीचा प्रस्ताव बारगळ्यानंतर मुंबई महापालिकेतील शाळांच्या मुलांना भाजलेले चणे, शेंगदाणे तसेच मनुका आणि खारिक अशा मिक्स खाऊचं पाकिट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु विद्यार्थ्यांना चणे-शेंगदाण्यांचा खाऊ देण्यावर महापौरांसह गटनेत्यांचं एकमत होऊ शकलेले नसून अखेर प्रस्ताव पुढील सभेपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.


चिक्की बाजूलाच

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पोषक आहाराबरोबरच पूरक आहार वितरण योजनेतंर्गत चिक्की निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. परंतु चिक्कीसाठी ३ ते ४ वेळा निविदा काढूनही एकही पुरवठादार पुढे न आल्यामुळे अखेर चिक्कीचा विचार महापालिकेने डोक्यातून काढून टाकला आहे.


कुठलाही निर्णय नाही

आता या चिक्कीला पर्याय म्हणून चणे, शेंगदाणे यासह मनुका व खारिक अशाप्रकारचे खाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीला ठेवला होता. परंतु यावर कोणताही निर्णय गटनेत्यांच्या सभेत होऊ शकलेली नाही.


गटनेत्यांच्या निर्णयाकडे लक्ष

महापालिकेतील शाळांमधील मुलांना चिक्की देण्याची मागणी होत असताना, त्यासाठी कोणताही पुरवठादार पुढं येत नव्हता. त्यामुळे या चिक्कीचा पुरवठा शहर विभागासह पूर्व व पश्चिम उपगरांसाठी विभागून देऊन कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यालाही प्रतिसाद न लाभल्यामुळे आता चणे व शेंगदाणे पुरवठा करण्याचा निर्णय घेऊनही गटनेत्यांकडून याला कोणतीही मंजुरी न मिळाल्यामुळे मुलांना खरोखर हा आहार देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे.


प्राथमिक शाळेतील विद्यार्थी

  • पूर्व प्राथमिक शाळा ते इयत्ता ५ वी = १ लाख ९७ हजार ५७९
  • इयत्ता ६ वी ते ८ वी: १ लाख २ हजार ९१७


माध्यमिक शाळेतील विद्यार्थी

  • इयत्ता ५ वी = १ हजार ६९७
  • इयत्ता ६ वी ते १० वी: ३६ हजार ८२७
  • मिक्स खाऊ पाकिट (पाचवीच्या खालील इयत्तेसाठी) भाजलेले चणे ५ ग्रॅम, भाजलेले शेंगदाणे ५ ग्रॅम, मनुके ५ ग्रॅम, खारीक २ नग
  • मिक्स खाऊ पाकिट (सहावीपासून): भाजलेले चणे १० ग्रॅम, भाजलेले शेंगदाणे १० ग्रॅम, मनुके १० ग्रॅम, खारीक २ नग



हेही वाचा-

महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा