Advertisement

दुर्घटनांमध्ये बचावासाठी बीएमसी देणार नागरिकांना विशेष प्रशिक्षण

मुंबईत अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे दुर्घटना घडू शकतील विभागाचा आणि इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

दुर्घटनांमध्ये बचावासाठी बीएमसी देणार नागरिकांना विशेष प्रशिक्षण
SHARES

मुंबई शहरात वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. तसंच इमारती, घरे कोसळून अनेकांचे बळी जातात. अशा घटनांमध्ये जिवीत हानी होऊ नये म्हणून मुंबई महापालिका दुर्घटना घडण्याची ठिकाणे आणि आग लागू शकते अशा ठिकाणांचा सर्व्हे करणार आहे. तसंच अशा विभागांमधील नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.


मुंबईत अनेक धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे दुर्घटना घडू शकतील विभागाचा आणि इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आगी लागण्याच्या, घरे इमारती आणि दरडी कोसळण्याची शक्यता आहे त्याची यादी व अहवाल पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात ठेवला जाणार आहे. यामुळे कोणती दुर्घटना घडल्यास त्या विभागाची इत्यंभूत माहिती पालिकेकडे आणि अग्निशमन दलाकडे असणार आहे.


यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी त्वरित मदत कार्य पोहचवणे शक्य होणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. आगी लागल्यावर, घरे, इमारती, दरडी कोसळल्यावर त्यात अनेक जण अडकून पडतात. या अडकलेल्या लोकांची सुटका कशी करावी याचं प्रशिक्षण नागरिकांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत घटनास्थळाजवळील नागरिक अडकलेल्या लोकांचा जीव वाचवू शकतील.



हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा