Advertisement

बीएमसीत इंजिनीअरची 'इतकी' पदं भरणार

मुंबई महापालिकेत (बीएमसी) लवकरच कनिष्ठ इंजिनीअर पदासाठी लवकरच भरती होणार आहे.

बीएमसीत इंजिनीअरची 'इतकी' पदं भरणार
SHARES
मुंबई महापालिकेत (बीएमसी) लवकरच कनिष्ठ इंजिनीअर पदासाठी लवकरच भरती होणार आहे. यामध्ये ३४१ कनिष्ठ इंजिनीअर भरले जाणार आहेत. भरतीची ही प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार आहे.

पालिकेच्या नगर अभियंता खात्याच्या अभियांत्रिकी वर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २४३ पदे आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत) ९८ अशी एकूण ३४१ पदं भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.  आयबीपीएस कंपनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे अशी कामे करणार आहे.  

 मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये तर खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. भरती प्रकिया राबवणाऱ्या कंपनीला दोन कोटींचे मानधन देऊन पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहेत. 


हेही वाचा - 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा