Advertisement

गळती रोखण्यासाठी महापालिकेचं 'विद्यार्थी जोडो' अभियान, आणखी ३९६ बालवाड्या वाढवल्या

महापालिकेने सध्याच्या ५०४ बालवाड्यांव्यतिरिक्त ३९६ नवीन बालवाड्या २२ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरु केल्या आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १३३ बालवाड्या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ९२ बालवाड्या उर्दू माध्यमाच्या, ८७ बालवाड्या हिंदी माध्यमाच्या, २५ बालवाड्या गुजराती माध्यमाच्या, २३ बालवाड्या इंग्रजी माध्यमाच्या असणार आहेत.

गळती रोखण्यासाठी महापालिकेचं 'विद्यार्थी जोडो' अभियान, आणखी ३९६ बालवाड्या वाढवल्या
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये लागलेली गळती कमी करण्यासाठी महापालिकेनं बालवाडीच्या माध्यमातून 'विद्यार्थी जोडो' अभियान सुरू केलं आहे. त्याकरीता सध्याच्या ५०४ बालवाड्यांव्यतिरिक्त ३९६ नवीन बालवाड्या २२ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालवाड्यांमधील पटसंख्या २७ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.


कुठल्या माध्यमाच्या बालवाड्या?

नव्याने सुरु होणाऱ्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १३३ बालवाड्या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ९२ बालवाड्या उर्दू माध्यमाच्या, ८७ बालवाड्या हिंदी माध्यमाच्या, २५ बालवाड्या गुजराती माध्यमाच्या, २३ बालवाड्या इंग्रजी माध्यमाच्या असणार आहेत.

या खालोखाल कन्नड व तेलगू भाषिक माध्यमांच्या प्रत्येकी १० बालवाड्या; तर तामिळ माध्यमाच्या ९ बालवाड्या असणार आहेत. या व्यतिरिक्त ६ बालवाड्या या 'सेमी इंग्रजी' माध्यमाच्या असणार असून १ बालवाडी 'मुंबई पब्लिक स्कूल'अंतर्गत असेल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली आहे.




आकर्षक रंगरंगोटी

आधी सुरु असलेल्या बालवाड्यांसह सर्व बालवाड्यांमध्ये चिमुकल्यांना आवडतील अशी रंगरंगोरटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पशु-पक्षी, डोंगर-नदी, हिरवी झाडे, फळे-फुले, सूर्य-चंद्र-तारे यासारख्या निसर्गातील चित्ताकर्षक बाबींसोबतच लहानग्यांचे आवडते कार्टुन्सदेखील बालवाड्यांच्या भिंतीवर विराजमान होणार आहेत. याचसोबत मोठ्या प्रमाणात आकर्षक खेळणी देखील बालवाड्यांमध्ये मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.


कुठल्या विभागांत?

विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी दक्षिण मुंबईतील 'बी' व 'सी'या दोन विभागांमध्ये यापूर्वी महापालिकेच्या बालवाड्या नव्हत्या. मात्र आता या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ५ व १२; याप्रमाणे एकूण १७ बालवाड्या पहिल्यांदाच सुरु होणार आहेत.


आधीच्या बालवाड्या 'अशा'

आधीपासून सुरु असलेल्या ५०४ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १९० बालवाड्या या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ११४ बालवाड्या हिंदी माध्यमाच्या, १०७ बालवाड्या उर्दू माध्यमाच्या, ६६ बालवाड्या इंग्रजी माध्यमाच्या, १० बालवाड्या तामिळ माध्यमाच्या आहेत. या खालोखाल गुजराती माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी ६, तर कन्नड व तेलगू माध्यमाच्या प्रत्येकी १ बालवाड्या सध्या कार्यरत आहेत. यासर्व कार्यरत असलेल्या बालवाड्यांची पट-क्षमता ही १५ हजार १२० एवढी आहे.


पटसंख्या वाढणार

सध्या मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांतर्गत सर्वाधिक म्हणजे ८६ बालवाड्या या 'एल'विभागात आहेत. तर नवीन प्रस्तावानुसार या विभागात आणखी २५ बालवाड्या सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामुळे या विभागातील बालवाड्यांची संख्या आता १११ एवढी होणार आहे.यामध्ये १० इंग्रजी, १ गुजराती, हिंदी २६ (नवीन ३ सह),३३ मराठी (नवीन १६ सह), सेमी इंग्रजी २, उर्दू ३९(नवीन ३ सह); अशा सहा भाषिक बालवाड्यांचा समावेश असल्याचेही आबासाहेब जऱ्हाड यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

सर्व शाळेत मोदीपट दाखवा, शिक्षण विभागाची सक्ती

शाळकरी मुलांसाठी शिक्षण विभागाकडून 'रक्षा अभियान'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा