Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

सर्व शाळेत मोदीपट दाखवा, शिक्षण विभागाची सक्ती


सर्व शाळेत मोदीपट दाखवा, शिक्षण विभागाची सक्ती
SHARES

दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात क्रेंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी (भाजप) व शिवसेनेचे गुणगान करण्यात आल्यची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. त्यानंतर आता राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधरित लघुपट सक्तीने दाखवला जावा, याबाबत सर्व शाळांना शिक्षण विभागाद्वारे सक्ती केली जात आहे.


शासनाने काढले आदेश

येत्या मंगळवारी म्हणजे १८ सप्टेंबरला अर्ध्या तासाच्या लघुपटाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा लघुपट पाहावा, यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे आदेश शासनाने काढले आहेत. दरम्यान या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत असून शिक्षणाद्वार राजकीय प्रचार करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही केली जात आहे.


चलो जीते हैं

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या अर्ध्या तासाच्या लघुपटाचे प्रक्षेपण लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे केले जाणार आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० व दुपारी ३ वाजता या लघुपटाचे स्ट्रिमिंग केलं जाणार असून त्यासाठी सर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करण आवश्यक आहे. याबाबतच्या काही सूचनाही विभागातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. 


सर्व शाळांपर्यंत हा आदेश

हा लघुपट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहावा, यासाठी शालेय स्तरावर योग्य ती कार्यवाही केली जावी, असं या आदेशात म्हटलं आहे. या संदर्भातील आदेश थेट मंत्रालय स्तरावरून काढण्यात आले आहेत. हा आदेश मंत्रालय स्तरावरून जिल्हा परिषद, महापालिकांच्या शिक्षण प्रमुखांपर्यंत तसंच शिक्षण विभागामार्फत पुढे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील एक दोन दिवसात सर्व शाळांपर्यंत हा आदेश दिला जाणार आहे.


म्हणून हा निर्णय घेतला

नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांना हवे तेव्हा ते जनतेशी थेट संवाद साधू शकतात. त्यासाठी ते 'मन की बात' सारखे कार्यक्रमही करतात. मात्र, त्यांच्यावरील लघुपटाची सक्ती विद्यार्थ्यांवर करणे अत्यंत चुकीचे आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. आधीच सणासुदीच्या सुट्या, शिक्षकांवर लादले जाणारे अन्य उपक्रम यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहेच. या लघुपटाच्या प्रक्षेपणामुळेही शैक्षणिक कामकाजाचे नुकसान होणार आहे. सरकारने त्वरित हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी काही शिक्षक करत आहेत.


मुख्यमंत्र्यांनी केली पोस्ट

या लघुपटाचा प्रिमिअर मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रिमिअरला अनेक अभिनेते, आघाडीचे क्रीडापटू, उद्योजक यांनी हजेरी लावली होती. या प्रिमिअरनंतर 'दुसऱ्यांसाठी जगणे, हेच खरे जीवन आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या बालपणावर आधारित 'चलो जीते है' या लघुपटाच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. 

स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी जगणे ही आपली समृद्ध संस्कृती आहे. आपल्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व प्रतिकूलतेवर मात करून स्वतःचे जीवन जगत असताना इतरांची दुःख नुसती ओळखायचीच नाही, तर त्यावर या बालवयात समाधान शोधायचे. मला खात्री आहे की हा लघुपट अनेकांना प्रेरणा देईल', अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर केली होती.


शाळांना 'हे' करावं लागणार

सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायची आहे. त्याचबरोबर किमान एक एमबीपीएस वेग असलेले इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तर प्रोजेक्टर, स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याचे आदेशही शाळांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हा लघुपट लाइव्ह स्ट्रिमिंग केला जाणार असल्यान त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सूचना देखील शाळांना देण्यात आल्या आहेत.

सरकारने त्यांना जे काही चित्रपट दाखवायचे ते दाखवावे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र हे करत असताना शिक्षकांच्या नेमणुका करून विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देण्याकडेही लक्ष पुरवावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तताही करावी. 

- कपिल पाटील, शिक्षक आमदार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा