मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

  Pali Hill
  मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
  मुंबई  -  

  मुंबई - महानगरपालिकेनं सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिलीये. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापालिकेनं केली आहे. गेल्या वर्षी यासाठी 149 कोटी 18 लाख रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली होती. तर यावर्षी ही रक्कम 154 कोटी 69 लाखांच्या घरात गेलीय.

  बेस्ट तोट्यात असल्यानं बेस्ट प्रशासनानं बोनस देण्यास नकार दिला होता. त्यामुळे बेस्टला बोनस द्यायचा की नाही यासंदर्भातला चेंडू महापौरांच्या कोर्टात गेला होता. त्यानुसार महापौरांनी बेस्ट कर्मचाऱ्यांनाही 5 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलंय. त्यासाठी पालिका बेस्टला 24 कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून देईल.

  कुणाला किती अनुदान?
  अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2,200 रुपये
  सामाजिक महिला आरोग्य स्वयंसेविका 4,100 रुपये
  मनपा शाळेतील शिक्षण सेवक 4,400 रुपये
  बेस्ट कर्मचारी 5500 रुपये
  अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7,000 रुपये
  वेतनश्रेणीतील कर्चमारी 14,000 रुपये.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.