Advertisement

पावसाने ब्रेक घेताच महापालिकेची स्वच्छता मोहीम


पावसाने ब्रेक घेताच महापालिकेची स्वच्छता मोहीम
SHARES

मंगळवारी संध्याकाळपासून ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यात गुंतलेले महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी पावसाने अधेमध्ये ब्रेक घेताच साफसफाईच्या कामाला लागले. पावसाच्या पाण्याने तंरगून वर आलेला कचरा शहरात अनेक ठिकाणी साचला आहे. हा कचरा साफ करण्याची मोहीम आता महापालिकेने हाती घेतली आहे.



मुंबईत पुढील ७२ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर महापालिकेनेही अलर्ट जाहीर केला. या पावसात महापालिकेचे सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या सर्व झाकणांवरील कचरा गोळा करून पाण्याचा प्रवाहाचा मार्ग मोकळा केला.



समुद्राला दुपारी १२ ची भरती असल्यामुळे दुपारी २ नंतर ओहोटीला सुरुवात झाली. त्यानंतर महापालिकेने सर्व विभागांत वाहून आलेला कचरा साफ करण्यावर भर दिला. पावसाची संततधार सुरू असतानाही हे काम सुरू होते. समुद्राच्या भरतीचे टेन्शन नसल्यामुळे तसेच ढग पुढे निघून गेल्यामुळे महापालिकेचे अधिकारी निश्चिंत दिसत होते. बुधवारी काही मोजक्या भागांमधील पाण्याचा अपवाद वगळता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात होती. अनेक भागांमधील वाहतूक सुरळीत सुरू होती.


बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत पाणी साचलेली ठिकाणे

  • स्थळ : हिंदमाता, शीव रोड क्रमांक २४
  • पश्चिम उपनगर : वि. रा. देसाई मार्ग, एअर इंडिया कॉलनी, मिलन सबवे, अंधेरी सब वे, वांद्रे पश्चिम नॅशनल कॉलेज, कोहीनूर सिटी मॉल, दहिसर, बोरीवली काजू पाडा
  • पूर्व उपनगर : घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर, कुर्ला, क्रांतिसिंहनगर
  • चेंबूर शेल कॉलनी, मानखुर्द

हेही वाचा - 

सोसायट्यांचा कचरा आणखी ६ महिने उचलणार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा