• खड्डे बघून पालिका कर्मचारी माघारी
  • खड्डे बघून पालिका कर्मचारी माघारी
SHARE

धारावी - 90 फूट रोडवर, माहिम धारावी ब्रीज सिग्नल जवळ एक मोठा खड्डा पडलाय. तो बुजवण्यासाठी गेलेले पालिकेचे कर्मचारी खड्डा न बुजवता परतल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. धारावीतल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याचा स्थानिक आणि प्रवाशांना त्रास होतोय. खड्ड्याच्या शेजारी गटारही आहे. त्या ठिकाणी नेहमीच चिखल आणि पाणी साचतं. त्यामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कुल बसेस चालवताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. दु-पदरी मार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ दिसून येते. सतत वाहनांची ये-जा असल्यामुळे दिवसेंदिवस या खड्ड्याचा आकारही वाढलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या