Advertisement

हितसंबंध असणाऱ्यांनाच मी नको आहे - सुरेश बनसोडे


हितसंबंध असणाऱ्यांनाच मी नको आहे - सुरेश बनसोडे
SHARES

महापालिका आयुक्तांनी माझ्यावर ठेवलेला अकार्यक्षमतेचा ठपका आपल्याला मान्य नसल्याचे सांगत आपण निर्दोष असल्याचे महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पदावर पुन्हा विराजमान झालेल्या सुरेश बनसोडे यांनी स्पष्ट केले. ज्यांचे कुठे तरी हितसंबंध गुंतलेले आहेत, त्यांनाच मी नको आहे, असाही चिमटा त्यांनी नाव न घेता आयुक्तांसह भाजपाला काढला.


'पहिल्या दिवसापासूनच विरोध होता'

महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुरेश बनसोडे यांच्यावर बाहेरच्या कंपनीला गोपनीय कागदपत्रे पुरवण्याच्या आरोप ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा बनसोडे सेवेत परतले असून याबाबत त्यांनी प्रशासनाविरोधातील भडास बाहेर काढली. यावेळी त्यांनी खळबळजनक दावा करत राज्य शासनाच्या सेवेतून महापलिका सेवेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मला प्रखर विरोध होत होता, असे सांगितले.


बदली गैरसमजातून

मी कुठल्याही ठेकेदाराला ठेका मिळवून देण्यात सहकार्य केलेले नाही. पण गैरसमजातून आपली बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे नव्या तडफेने आणि गुणात्मक, दर्जात्मक काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



हेही वाचा

जकात विभागातील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन होणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा