Advertisement

उद्यान विभागाचे जितेंद्र परदेशी यांना ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ पुरस्कार


उद्यान विभागाचे जितेंद्र परदेशी यांना ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ पुरस्कार
SHARES

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह सहायक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर हे मार्च महिन्याचे मानकरी ठरले आहे. पाणी, जलचर आणि जलप्रदूषण या विषयावर आधारीत उद्यान विषयक प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल या दोघांची ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शनिवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या दोघांना सन्मानित करण्यात आलं.

‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ (राणीची बाग) या मुंबईतील ऐतिहासिक उद्यानात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे आयोजन अत्यंत कल्पक पद्धतीने करण्यात आलं होतं. पाणी, जलचर व जलप्रदूषण असा प्रमुख विषय घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला तीन दिवसात दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली.

वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन आणि महापालिकेच्या उद्यान खात्याची सकारात्मक कार्ये लक्षात घेऊन उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी व सहाय्यक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर यांचा प्रातिनिधीक स्वरुपात ‘मार्च- २०१८’ या महिन्यासाठी ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त रमेश पवार, किशोर क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा