`शनिदेव`वर हातोडा

 BEST depot
`शनिदेव`वर हातोडा

कुलाबा - कुलाबा परिसरातील राजवाडकर स्ट्रीट येथील शनिदेव या चार मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेचा  हातोडा पडणार आहे. पालिकेच्या या धडक निर्णयामुळे अनधिकृत इमारत उभारण्याचे धाडस करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

शनिदेव इमारतीची विनापरवाना पुनर्बांधणी सुरू असल्याची तक्रार पालिकेकडे आली होती. त्यानुसार पालिकेने ऑक्टोबर 2014 मध्ये या इमारतीची पाहणी केली होती. त्यानंतर पालिका अधिनियम 354 ए अन्वये संबंधितांना बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.   

पुढे शनिदेव इमारतीचे प्रकरण कोर्टात गेल्यावर कोर्टाने स्टेटस-को आदेश पारित केले होते.   याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सदर इमारतीस सील ठोकण्यात आले. शेवटी शनिदेव इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या ए विभागाने सोमवारी घेतला. आता येत्या आठवडाभरात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. 

Loading Comments