Advertisement

ऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणी

मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाईनसह प्रत्यक्ष सुनावणीही होणार आहे.

ऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणी
SHARES

मुंबई उच्च न्यायालयात आता ऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ऑनलाईन सुनावणी होत होती. 

मुंबईसह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाईनसह प्रत्यक्ष सुनावणीही होणार आहे. आठवड्याचे चार दिवस प्रत्येक कोर्टाचं काम सुरू राहील. यामध्ये तीन दिवस प्रत्यक्ष तर एक दिवस ऑनलाईन कामकाज चालेल. 

निर्णय मुंबईसह हायकोर्टाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही लागू राहील. तर कोरोनाच्या अधिक धोका असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि बीडसह एकूण 11 जिल्ह्यांमधील कनिष्ट न्यायालय अर्धा दिवसच कार्यरत राहणार आहेत.  अन्य जिल्ह्यातील न्यायालयांना पूर्ण दिवस काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. वकिलांसाठी तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राज्य सरकारनं गुरूवारी माहिती देताना सांगितलं की, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल व तो सोमवारी उच्च न्यायालयात सांगितला जाईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा