Advertisement

‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश

आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश
SHARES

रॅपिडो या मोबाईल आधारित टॅक्सी- बाईक सेवा देणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आज दुपारपासून राज्यातील रॅपिडोची सर्व सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी रॅपिडोकडे आवश्यक परवाना नसल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले. दरम्यान, याप्रकरणी २० जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

रॅपिडोने गेल्यावर्षी पुणे आरटीओमध्ये ॲग्रीगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज परिवहन विभागाकडून नाकारण्यात आला होता. याविरोधात रॅपिडोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ही सेवा बेकायदेशीर असून अशा प्रकारची सेवा देण्याचे धोरण राज्यात नाही, असे परिवहन विभागाकडून न्यायालयात सांगण्यात आले.

तसेच राज्य सरकारने ‘बाइक टॅक्सी’बाबत स्वतंत्र समिती स्थापन केल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने आज दुपारी १ वाजेपासून राज्यातील रॅपिडोची सेवा २० जानेवारीपर्यंत बंद करावी, असे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा

मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले, 'या' तारखेपासून येणार सेवेत

बेस्टच! लवकरच खारघर ते बीकेसी प्रीमियम बस सेवा सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा