Advertisement

खारफुटीची लागवड वसईऐवजी राजोडीला

बोरिवली आणि विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी 30 ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेला 2,612 खारफुटी तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.

खारफुटीची लागवड वसईऐवजी राजोडीला
SHARES

मुंबई (mumbai)  उच्च न्यायालयाने (high court) मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टने (MUTP) खारफुटी झाडांची लागवड करण्याचे ठरवले होते. ही लागवड पूर्वी वसईला होणार होती. मात्र आता ही लागवड वसईऐवजी राजोडी येथे होणार आहे. या लागवडीत 7,823 नवीन खारफुटी झाडांची लागवड होणार आहे.

बोरिवली आणि विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनच्या बांधकामासाठी 30 ऑगस्ट रोजी पश्चिम रेल्वेला (WR) 2,612 खारफुटी तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.

या निर्णयाबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. यावर पर्याय म्हणून प्रशासनाने वसई येथे नव्या खारफुटी क्षेत्राची लागवड करण्याचे ठरवले होते. सुधारित रेल्वे मार्गातून अंदाजे 1.7 दशलक्ष प्रवाशांना फायदा होईल अशी अपेक्षा पश्चिम रेल्वेने (western railway) व्यक्त केली.

न्यायालयाने पश्चिम रेल्वेला वसई येथे 7,823 खारफुटीची (mangroves) लागवड करून प्रभावित झालेल्या जमिनीसाठी नुकसानभरपाई करण्याचे निर्देश दिले होते. 

पश्चिम रेल्वेला 7,823 खारफुटीची लागवड पूर्ण करायची होती. तसेच किमान 10 वर्षे त्याची देखभाल करायची होती. 18 डिसेंबर, 2024 रोजी, पश्चिम रेल्वेने याच याचिकेअंतर्गत अर्ज दाखल केला होता.

ज्यात त्याच्या मागील आदेशात बदल करण्याची आणि राजोडी येथे अधिक चांगल्या जागेवर नुकसान भरपाई देणारी खारफुटीची लागवड करण्याची विनंती केली होती. पश्चिम रेल्वेने खारफुटीच्या लागवड करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने नवीन प्रस्तावित जागेवर नुकसानभरपाईच्या वृक्षारोपणाला परवानगी दिली. 



हेही वाचा

नव्या वर्षात पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता

मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये लवकरच डस्टबिन बसवले जाणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा