Advertisement

मुंबई हायकोर्टाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर निवृत्त


मुंबई हायकोर्टाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर निवृत्त
SHARES

सोमवारी ५ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर सेवानिवृत्त झाल्या. ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १५ महिने पदभार सांभाळल्यानंतर सोमवारी त्या निवृत्त झाल्या.

मेट्रोसंदर्भातील अनेक याचिकांच्या सुनावणीदरम्यान त्यांनी जे महत्त्वपूर्ण निर्णय दिले त्यासाठी नेहमीच त्यांची आठवण काढली जाईल. त्यांनी विकासाला नेहमीच प्राधान्य दिलं. ध्वनी प्रदूषण आणि फायर सेफ्टीच्या नियमांचं उलंघन केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मेट्रोचे काम देखील थांबवलं होतं.


मेट्रो दरवाढ रद्द

मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो दरवाढीचा प्रस्ताव नुकताच फेटाळून लावला. यासंदर्भात राज्य सरकारला एक समिती स्थापन करण्यास सांगून ३ महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.


'इथे' पहिला मान 

न्यायमूर्ती चेल्लूर यांचा जन्म ५ डिसेंबर १९५५ मध्ये कर्नाटकच्या बेल्लारीत झाला. त्या बेल्लारीच्या पहिल्या महिला अधिवक्ता बनल्या. त्यानंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पहल्या महिला न्यायाधीशपदाचा कारभार सांभाळला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा