'मनातली माणसं' या पुस्तकातून तरुण पिढीला योगदान - शरद पवार

 Parel
'मनातली माणसं' या पुस्तकातून तरुण पिढीला योगदान - शरद पवार
Parel, Mumbai  -  

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर लिखित 'मनातली माणसं' हे पुस्तक माणसाला माणूस म्हणून जोडण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेच. मात्र त्याहीपेक्षा तरुण पिढीला थोर मान्यवरांचा इतिहास देखील सांगणारे असे हे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. 

'मनातली माणसं' या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शनिवारी परळ भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात पार पडला त्यावेळी पवार बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम, नाथ पै आदी 20 जणांचे चारित्र्य या पुस्तकात मांडण्यात आले आहे. माणसांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम, माया, शिकवण अशा चौकटीत या पुस्तकाचे वर्णन करण्यात आले आहे. हे तरुण पिढीला नक्कीच मोलाचे ठरेल. पण सध्याच्या तरुण पिढीला वाचनामध्ये आस्था राहिली आहे का? अशी खंतदेखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुशिलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते.

Loading Comments