आरोही पंडित ठरली २ महासागर पार करणारी पहिली महिला

मुंबईत राहणाऱ्या २३ वर्षीय कॅप्टन आरोही पंडितनं आपल्या नावे नव्या विक्रमची नोंद केली आहे. आरोहीनं नुकताच पश्चिम महासागर पार केला आहे.

SHARE

मुंबईत राहणाऱ्या २३ वर्षीय कॅप्टन आरोही पंडितनं आपल्या नावे नव्या विक्रमची नोंद केली आहे. आरोहीनं नुकताच पश्चिम महासागर पार केला आहे. याआधी आरोहीनं लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्यानं अटलांटिक महासागर पार केला होता. दरम्यान, आरोही ही २ महासागर पार करणारी जगातील पहिला महिला ठरली आहे. आरोहीच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक केलं जात आहे.

रशियामध्ये विमान लॅण्ड

२३ वर्षीय आरोही पंडितनं पश्चिम महासागर पार करण्यासाठी आलास्का येथून उड्डाण घेतलं आणि बेरींग सागर पर करत रशियामध्ये विमान लॅण्ड केलं. आरोहीनं स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्यानं पश्चिम महासागर पार केला. विमान लॅंडींगनंतर तिनं भारताचा झेंडा हातात धरून फोटो काढला.   

७ महिने प्रशिक्षण

आरोही पंडित ही मुंबईतल्या बोरिवलीमधील आय सी कॉलनीमध्ये राहणारी रहिवाशी आहे. तसंच, पश्चिम महासागर पार करण्यासाठी आरोहीनं ७ महिने प्रशिक्षण घेतलं होतं.हेही वाचा -

आरोही ठरली अटलांटिक पार करणारी जगातील पहिली महिला

स्पाईस जेटच्या विमानासमोर आला अज्ञात व्यक्ती, थोडक्यात टळला अनर्थसंबंधित विषय
ताज्या बातम्या