Advertisement

बोरिवली स्थानक स्मार्ट स्थानक होणार

पश्चिम रेल्वेकडून येथे शहरातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग प्रणाली बसवली जात आहे.

बोरिवली स्थानक स्मार्ट स्थानक होणार
SHARES

बोरिवली (borivali) रेल्वे स्थानक आता स्मार्ट स्थानक म्हणून विकसित होत आहे. पश्चिम रेल्वेकडून (western railway) येथे शहरातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग प्रणाली बसवली जात आहे.

या नव्या प्रणालीमुळे लोकल गाड्यांची ये-जा अधिक सुरळीत होणार आहे. वेळापत्रक सांभाळणं आणि पीक अवर्समधील गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या कांदिवली (kandivali) ते बोरिवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून बोरिवली रेल्वे स्थानकाचं सिग्नलिंग पूर्णपणे आधुनिक केलं जात आहे.

आतापर्यंत लोकल वाहतुकीसाठी जुनी रिले-बेस्ड सिग्नलिंग प्रणाली वापरली जात होती, जी अनेक दशकांपासून कार्यरत होती. आता तिच्या जागी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे.

या प्रणालीअंतर्गत एकूण 381 रेल्वे मार्ग एकाच सिस्टिमखाली आणण्यात आले आहेत. यामध्ये 56 सिग्नल डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित केले जात आहे.

सुरक्षित वाहतुकीसाठी 90 ट्रॅक पॉइंट्स म्हणजेच स्विचेस इलेक्ट्रॉनिक (switches electronic) नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहेत.

तसेच गाड्यांची स्थिती तपासण्यासाठी 123 ट्रॅक सर्किट्स बसवण्यात आली असून, सातही मार्गिका एका नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत.

बोरिवली रेल्वे स्थानकात यासाठी एक अत्याधुनिक सिग्नलिंग नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात दोन 65-इंची 8K डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर गाड्यांची हालचाल प्रत्यक्ष वेळेत दिसते.

त्यामुळे तांत्रिक बिघाड, आपत्कालीन परिस्थिती किंवा गर्दीच्या वेळी अधिक वेगाने आणि योग्य निर्णय घेणं नियंत्रकांना शक्य होणार आहे.

2026 च्या सुरुवातीपर्यंत बोरिवलीची ही नवी सिग्नलिंग प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, ती मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत प्रणाली ठरणार आहे.



हेही वाचा

1995 पासून SRA कडून मुंबईत 97 हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांना घरे

पालघरमध्ये प्रशासनाविरोधात 'लाल वादळ' उठले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा